हिंसेत सर्वनाश आणि अहिंसेत सृजन असते. त्यामुळे कुणी काहीही म्हटले तर महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्त्व समाजाला अंगीकारावेच लागेल. हे केंद्र सरकारला आणि विशेषतः त्याच्या समर्थकांना का समजत नाही हा प्रश्न आहे.
-------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक भाषण मी ऐकली. विशेषतः निवडणुकीच्या काळात त्यांनी ज्या तडफेने लोकांच्या मनातल्या गोष्टी करून एक झंझावात निर्माण केला, त्याला तोड नव्हती. पण आता मोदींचे एकही भाषण ऐकू वाटत नाही. भाषण लागलेले असले की रिमोटचे बटन दाबून पुढचे चॅनेल लावतो. असे का व्हावे. मी या प्रश्नाचे उत्तर शोधू लागलो तर मला भोवताली नजर टाकल्यावर वातावरणातला विखार अंगावर येतो. निवडणुकीच्या काळात देशातील मोदी हे फेकू आहेत, असे अनेकजण म्हणत होते. मला ते खरे वाटत नव्हते. आता मला मोदी चालू वाटतात. त्याला कारणे अनेक आहेत. मोदी सरकार काही काम करतंय काय, तर या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. कोणतेही सरकार आले तरी काही ना काही सुरूच असते. ते या सरकारचेही सुरू आहे. लोकांच्या अपेक्षा आणि सरकारच्या मर्यादा यात अंतर असते. ते सहाजिकही आहे. मोदींना आपल्याला फसविले, असे लोकांना वाटू लागले त्याची कारण अनेक आहे. मोदी विकासाच्या मुद्द्यावर मत मागत होते. एकाच दिवशी ते अनेक सभा घ्यायचे. मला तो दिवस आठवतो. त्यांनी गुजरातमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला. तिथून ते सांगलीला आले. तिथून सोलापुरात सभा घेऊन लातूरला गेले आणि संध्याकाळी पुण्यात सभा घेतली. ही चारही भाषणे एकाच दिवशी त्यांनी केली. प्रत्येक ठिकाणी ते वेगळे बोलत होते. लोकांच्या काळजाला हात घालणारी भाषा होती. सांगली सोलापुरात ते सिंचनाच्या प्रश्नावर बोलले. पुण्यात आंतरराष्ट्रीय संबंधावर त्यावेळचे केंद्र सरकार कसे कमी पडतंय हे सांगितले. संवादी भाषणामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. पण आता मोदी त्यांना हव्या त्या विषयावरच बोलतात, हे उघड झाले आहे. त्यामुळे ते दादरीच्या विषयावर तोंड उघडत नाहीत. हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठ विद्यापीठ झालेल्या आत्महत्येबाबत त्यांची फौज एकाद्या मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्याची जात काढण्याचा निर्लज्जपणा करते. दिल्लीत तर काही पुरावे नसतानाही विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. काय चाललेय या देशात? अत्यंत खतरनाक प्रवृत्तींच्या ताब्यात हा देश गेलेला आहे, असे अनेकजण आज बोलतात.
शुक्रवार, ११ मार्च, २०१६
अस्वस्थ विद्यार्थी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा